- घर
- Show Content
लांब उडी
लांब उडी
१) खेळाडूच्या सर्वोत्तम सफल प्रयत्नावर स्पर्धेतील क्रमांक काढला जाईल. २) ज्या स्पर्धेत ८ खेळाडूपेक्षा अधिक खेळाडू भाग घेत असतील, तेथे प्रथम ३ संधी देवून अंतीम ८ खेळाडू काढले जातील व परत त्यांना ३ संधी देवून क्रमांक काढले जातील. मात्र आठव्या क्रमांकावर बरोबरी झाली तर आणखी ३ प्रयत्न वा संधी दिल्या जातील. स्पर्धेत फक्त ८ किंवा त्यापेक्षा कमीस्पर्धक भाग घेत असतील तर त्या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी ६ प्रयत्न करता येतील. ३) उडी मारताना उडी मारण्याच्या फळीच्या पलीकडच्या बाजूला स्पर्श केल्यास या बोर्डाच्या समोर असलेल्या प्लॅस्टीसिन वा मातीच्या ३ सेमी रूंदीच्या थराला स्पर्श झाल्यास फळीच्या पुढून वा बाजूने उडी घेतल्यास, उडी मारल्यानंतर पाठीमागे चालत असल्यास, उडी मारताना हवेत कोलांटी उडी मारल्यास वा धावत खड्ड्यात गेल्यास वा अनावश्यक वजने वा तत्सम पदार्थ शरीरावर बाळगून उडी मारल्यास उडी अयशस्वी ठरवली जाते. ४) सर्वसाधारण ४० मी. लांबीपर्यंत १.२२ मी. रूंदीचा धाव मार्ग असावा. स्पर्धकाला उडी मारण्यासाठी खड्ड्यापासून १ मी. अंतरावर १९.८ सेमी ते२०.२ सेमी रूंद १० सेमी जाड, १.२० ते १.२२ मी. लांब लाकडी फळी बसवलेली असते. खड्ड्टाच्या बाजूला या फळीसमोर १ सेमी ते १.३ सेमी उंचीचा ३ सेमी रूंदीचा लपास्टीसीन वा मातीचा थर असतो. याच फळीशी कोन ३० अंश असतो. फळी पृष्ठभागाशी निगडीत असे व ती पांढऱ्या रंगाने रंगविलेली असते. फॉल कळण्यासाठी प्लास्टीसीनचे इंडीकेटर असतात. धावपट्टीच्या बाजूला संघटन समितीने दिलेले स्मरण चिन्हठेवले जाईल. मात्र स्वत:च्या वस्तू ठेवता येणार नाहीत. ५) उडी मारण्याचा खड्डा ९ मी लांब व २.७५ मी रूंद असेल.
Leave a review