- घर
- Show Content
गोळा फेक
गोळा फेक
१.०६५ ते १.०७ मी. त्रिज्येच्या साहाय्याने वर्तुळ आखल्यावर टेपमध्ये ७३ सेमी अंतर
घेऊन टेप परिघावर रेषाजाडीच्या आतील कडेस सरळ धरावी व दोन्ही बाजूस खुणा करून 27.36m वर्तुळ मध्याच्या खिळ्यापासून लाइनदोरी या खुणावरून पुढे वाढवावी वा बाहेरून फक्की आखावी ४०चा कोन मिळेल. दुसऱ्या पद्धतीत वर्तुळ आखून झाल्यावर त्याच्या 4- 13.68m . मध्यबिंदूत टेप अडकवून ज्या दिशेला सेक्टर आखावयाचा आहे त्या बाजूला २० सेमी अंतरावर खुण करून खिळा ठोकावा व त्यात टेपची कडी अडकवावी व दुसऱ्या बाजूस १३.६८ मीटरवर चाप ओढावा परत टेपची कडी वर्तुळ मध्यात टाकून टेपवर २० मीटर अंतर घेऊन आधीच्या चापवर छेदेल असा चाप ओढावा. पहिली २० मीटर ची रेषा व दोन कंस छेदलेल्या बिंदूची रेषा मध्याशी जोडल्यास ४० अंशाचा कोन मिळतो.
१) स्पर्धेत ८ पेक्षा अधिक स्पर्धक भाग घेत असतील तर ३ प्रयत्न प्रत्येकाला दिले जाऊन
अंतिम ८ खेळाडू काढून परत ३ प्रयत्न दिले जातील. मात्र स्पर्धेत आठ किंवा आठ पेक्षा
कमी खेळाडू असतील तर ६ प्रयत्न दिले जातील व चिठ्या टाकून कोणी कोणत्या क्रमाने गोळा टाकावयाचे ते ठरविले जाते. स्पर्धकाला स्पर्धेच्या ठिकाणी दोन फेकी सराव म्हणून टाकता येतील. मात्र सराव देखील चिठ्या टाकून आलेल्या क्रमवारी प्रमाणेच करता येईल. एकदा स्पर्धा चालू झाल्यावर Diameter 2.1m वर्तुळाचा व फेक करणाऱ्या क्षेत्राचा सरावासाठी उपयोग करता येणार नाही.
२) जास्तीत जास्त अंतर ज्याने टाकले असेल त्याप्रमाणे क्रमांक दिले जातील.
३) प्रत्येक फेक वर्तुळातून केले जाईल. स्पर्धकाने प्रयत्न करताना प्रथम: वर्तुळात स्थिर राहून प्रयत्न सुरू करावा. पवित्रा घेताच गोळा हनुवटी जवळ असावा व एकाच हातात पकडलेला असावा. त्यानंतर गोळा हनुवटीच्या पातळीच्या खाली येता कामा नये. तसेच फेक करताना खांद्याच्या रेषेच्या पाठीमागे नेता येणार आहे.
४) गोळा फेकताना स्पर्धकाने पुढील अर्धवर्तुळाला लागून फेकीच्या दिशेने बसविलेल्या रोधकाला ठोकर मारली वा स्पर्श केला तर चालतो.
५) फेकीच्या प्रयत्नात खेळाडूने रोधकास वरच्या पृष्ठभागास स्पर्श केल्यास, वर्तुळाबाहेर पाऊल टाकल्यास, शरीराच्या भागाने वर्तुळाबाहेरील जमीनीस स्पर्श केल्यास अयोग्य पद्धतीने फेकी केली. गोळा फेकल्यानंतर गोळा खाली पडण्याआधीच वर्तुळाच्या बाहेर पडल्यास व वर्तुळाच्या मागील अर्धवर्तुळाच्या बाजूने वा भागातून बाहेर न आल्यास प्रयत्न विफल ठरविला जातो.
६) स्पर्धकाने पवित्रा घेऊन फेकीला सुरूवात केल्यावर काही कारणामुळे त्याने गोळा वर्तुळात खाली ठेवला व कुठलेही नियमोल्लंघन न करता प्रयत्न स्थगित केल्यास त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास परवानगी आहे. मात्र प्रत्येक प्रयत्नात फक्त एकदाच असे करता येईल. अन्यथा प्रयत्नाला अयशस्वी ठरविले जाईल.
७) प्रत्येक फेकीचे मोजमाप लगेच करावे. गोळा पडेल त्या वर्तुळाची कड ते फेकीच्या वर्तुळाची आतील कड असे अंतर मोजावे. गोळा पडेल तेथे चिन्ह म्हणून चकती ठेवावी.
८) सर्व अधिकृत स्पर्धासाठी संघटन समितीने पुरविलेली साधने वापरावीत. स्पर्धकाला त्यात कोणताही बदल करता येणार नाही व स्वत:ची सामुग्री वापरता येणार नाही.
९) स्पर्धकाला फेक करताना कोणत्याही प्रकारचा अवाजवी फायदा मिळेल असे चिकट पट्टी दोन बोटांना एकत्रित लावणे, परवानगी शिवाय मनगटावर पट्टी, हातमोजे वापरता येणार नाहीत. त्याचबरोबर पावलांना अधिक चांगली पकड मिळावी म्हणून वर्तुळाच्या पृष्ठावर कोणतीही भुकटी वा द्रव पदार्थ टाकता येणार नाही.
१०) गोळ्यावर हाताची व्यवस्थित पकड बसावी म्हणून स्पर्धकाला किंवा राळ वा त्या प्रकारचा चिकट पदार्थ पाठीच्या मणक्यांना आधार म्हणून जाड कातड्याचा किंवा तत्सम पदार्थाचा पट्टा आधारासाठी बांधता येईल.
११) गोळा भरवी लोखंडाचा, पितळेचा व पोकळ पितळी गोळ्यात शिसे भरून गोलाकार व पृष्ठभाग मऊ असलेला असावा.
Leave a review