- घर
- Show Content
मैदानी खेळ
मैदानी खेळ
मैदानी खेळ
१) धावण्याच्या सर्व स्पर्धांसाठी खेळाडूला विशिष्ठ धावपट्टी दिलेली असते. प्रत्येक धावपट्टी ही १.२२ मीटरची असते. सर्वात आतील किनारीजवळील धावपट्टी ३० से.मी. वरून मोजली जाते व बाकीच्या सर्व रेषेपासून २० से.मी. अंतरावरून मोजल्या जातात. दोन धावपट्ट्यांच्या मध्ये ५ से.मी. रूंदीची रेषा असावी. प्रत्येक धावपट्टीच्या उजवीकडील रेषेची रूंदी ही धावपट्टीच्या एकूण रूंदीत समाविष्ट असते.
२) कोणत्याही धावण्याच्या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला ४०० मी.
अंतरच पळावे लागेल हे पाहावे. त्यासाठी पहिली धावपट्टी सोडून इतरांना ते अधिक अंतर पळावे लागते ते कमी करण्यासाठी त्यांनी प्रारंभ देताना प्रमाणीत अंतराने पुढे ठेवून प्रारंभ द्यावा. त्यात तरी सुद्धा प्रतिपूर्ती अंतराचा समावेश
करावा लागतो. ३) प्रत्येक स्पर्धा प्रकारचा प्रारंभ/समाप्ती होण्याच्या ठिकाणी
धावमार्गात समाविष्ट असलेली ५ से.मी. रूंदीची रेषा
४) अंतराच्या सर्व स्पर्धांना सुरूवात करताना प्रारंभकाने 'On your mark' 'Set' 'go' for all fueletten वाजविलेला बार अशी पद्धत वापरावी. इतर स्पर्धा 'On your mark' 'go' पिस्तुलाचा बार याच्या सहाय्याने सुरू होतील. रेखकाच्या तपासणी नंतर खेळाडूंना प्रारंभक 'Set' ही आज्ञा देईल त्यावेळेस स्पर्धकाचा प्रारंभरेषेच्या पुढील भागास स्पर्श होता कामा नये. अन्यथा चुकीचा प्रारंभ ठरतो. पवित्रा घेण्यासाठी लागणारा काही क्षणांचा कालावधी उलटल्यानंतर ही स्पर्धक निश्चल होऊ शकला नाही तर त्याने चुकीचा प्रारंभ (False Start) केला असे मानले जाते. त्याचप्रमाणे पवित्रा घेऊन स्थिर वा अचल झालेल्या खेळाडूने वा 'set ' मध्ये अचल राहिलेल्या खेळाडूने पिस्तूलाचा बार होईपर्यंत हालचाल केल्यास चुकीचा प्रारंभ दिला जातो. (False Start) स्पर्धकाने चुकीचा प्रारंभ केल्यास ताकीद देण्यात यावी. दोन वेळा चुकीचा प्रारंभ करणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धाप्रकारातून बाद (Disqualification) करण्यात येईल. अयोग्य रितीने झाल्यास रोधकाने (Recall Starter) पिस्तुलाचा आणखी एक बार काढून धावणाऱ्या स्पर्धकांना परत बोलवावे.
६) स्टार्टिंग ब्लॉक्स अधिकृत नियमाप्रमाणे असावेत. ते बिन लवचिक व ताठर असावेत व त्यापासून स्पर्धकाला अनुचित फायदा मिळू नये. 'set' ही सूचना मिळताच स्पर्धकाचे दोन्ही पाय ब्लॉकवर आणि हात जमिनीवर टेकलेले असलेले पाहिजेत. स्टार्टीग ब्लॉकसाठी सहजासहजी काढता येतील व त्याने धावपट्टीचे कमीत कमी खराबी होईल याची काळजी घ्यावी.
७) रिले स्पर्धेतील पहिला धावक व ४०० मि. खालील स्पर्धानाच ब्लॉक वापरता येईल.
८) ज्यास्पर्धकाचा स्पर्श धड, डोके, खांदा, पाय इत्यादी सहाय्याने अंतिम रेषेत प्रथम स्पर्श होईल त्या क्रमाने नंबर काढले जातील. फोटोफिनीश पद्धत वापरावी.
रिले स्पर्धा (४ x १००)
१) स्पर्धेचे टप्पे व संघातील प्रत्येक खेळाडूची प्रारंभ रेषा धावमार्गाच्या आडव्या आखाव्यात.
२) प्रत्येक स्पर्धकाच्या प्रारंभ रेषेपूर्वी १० मी. व नंतर १० मी. असे २० मी. अंतर ‘बदली क्षेत्र) म्हणून असते. या क्षेत्रात पुढील व मागील रेखा रुंदीसहीत यात समाविष्ट आहेत.
३) ४x १०० रिले स्पर्धेसाठी धावमार्गाचे ४ भाग केलेले असतात. पहिल्या धावपट्टीतील स्पर्धक सोडून इतरांना एक अतिरिक्त अंतर प्रारंभ दिलेला असतो. प्रत्येकाला बदली क्षेत्राच्या अलीकडून १० मी. धाव सुरू करता येते.
४) ४x १०० स्पर्धा आपल्या नेमून दिलेल्या धावपट्टीतूनच खेळाडूने व त्या संघाने पूर्ण करावयाची असते. स्पर्धेच्या धावपट्ट्या चिठ्या टाकून निवडल्या जातात.
५) स्पर्धकाला धावपट्टीवर स्मरणचिन्ह रेखाटताना पायाने घासून रेखाटण्यास व जिथे संघटन समितीने स्मरणचिन्हे उपलब्ध करून दिली आहेत तिच चिन्हे वापरता येतील. स्वत:च्या वस्तू वापरता येणार नाहीत.
६) लाकडाचे वा धातूने गडद रंगात रंगविलेले गुटगुटीत जोड नसलेले बॅटन असावे. त्याची लांबी कमीत कमी २८ से.मी. व जास्तीत जास्त ३० से.मी. इतकी असावी. परिघ १२ ते १३ से.मी. व वजन ५० ग्रॅम असावे. स्पर्धा पूर्ण होईपर्यंत स्पर्धकाचे बॅटन हातात सांभाळले पाहिजे. चुकून पडल्यास ज्याने ते पाडले त्यानेच ते उचलले पाहिजे. त्यावेळी अनावधानाने बॅटन घेण्यासाठी दुसऱ्या पट्टीत गेले तरी चालते.
Leave a review