- घर
- Show Content
लंगडी
लंगडी

१) लंडगीचे मैदान ९९ मीटर (चौरस) असून मध्यरेषा ही क्रॉसलाईन असेल.
२) शिल्लक राहिल्यास लंगडीला पुन्हा संधी नाही. धावणारे धावूशकतात.
३) पहिले तीन बाद झाल्यानंतर लंगडी घालणारा तोच असल्यास त्याने लाईन क्रॉस करणे आवश्यक.
४) लंगडीवाल्याने ग्राऊंडमध्ये पाय टेकल्यास, हात टेकवल्यास, पडल्यास तो बाद होईल व गुण नाही. गडीवाल्याचा फक्त फाऊल किंवा बाद होईल, गुण नाही.
५) लंगडीवाला बाहेर गेल्यास त्याने लंगडी घातली, तरी चालेल.
६) पळणारा एक पाय आत असल्यास बाद नाही. एक पाय मैदानाबाहेर गेला. तरी चालेल. आक्रमक
७) कमीत-कमी तीन पंच असावेत व१वेळाधिकारी असावा.
८) लंगडीच्या बॉक्समधून लंगडी घालणारा येईल.
९) पळणाऱ्यांनी बॅचने बॉक्समध्ये उभे रहावे, तिथूनच प्रवेश करावा.
१०) लंगडी व पळणीला खेळायला आल्यावर ती पाळी संपल्यावर खेळाडू बदलू शकता.
११) लंगडी घालणारा १० सेकंदांच्या आत यावा. नाहीतर तांत्रिक गुण दुसऱ्या संघाला देवून लंगडीवाल्याला आत घ्यावे.
१२)५ मिनीटांचे २-२ डाव द्यावेत. सामना गुण झाल्यास पुन्हा ५ मिनीटांत डावघ्यावा तरीही समान गुण झाल्यास पुन्हा टॉस करून पहिला खेळाडू कितव्या मिनीटाला बाद केला ते पाहून तो अगोदर (कमी वेळात) बाद झाला, तो संघ विजयी.




- Reviews (0)
Nothing Found...Leave a review