- घर
- Show Content
दिव्यांग विद्यार्थी योजना
दिव्यांग विद्यार्थी योजना
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ व योजना CWSN
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ व योजना
बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ( RTE ACT २००९) मधील प्रकरण २ भाग ३(२) नुसार नमुद असलेल्या दिव्यांग व्य संरक्षण व संपूर्ण सहभाग), १९९५ न्वकांकमांक २६ (अ) नुसार राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक दिव्यांग बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाची समान संधी देवून मुख्य प्रवाहात आणणे व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने समावेशित शिक्षण (IE) या उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांना शालेय परिसरात व दैनंदिन जीवनात सामाजिक, मानसिक शारिरीक व शैक्षणिक प्रक्रियेत कोणतेही अडथळे निर्माण होवू नयेत यासाठी विद्यार्थ्याचा प्रत्येक शैक्षणिक प्रक्रियेत येणा-या अडथळयांना पुरक शैक्षणिक सहाय्यभूत सेवा देण्याची महत्वपूर्ण भूमिका साकार करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रात त्यांना आवश्यक असणा-या शैक्षणिक पुनर्वसनात्मक सहाय्यभूत सेवा गटस्तरावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत प्रबंध पोर्टलमध्ये मंजूर करण्यात आलेले आर्थिक तरतूद मन २०२२-२२ या शैक्षणिक वर्षात खालील प्रमाणे शैक्षणिक सहाय्यभूत सेवा देण्याचे प्रस्तावित आहे.
विकासात्मक विकलंगता असलेले शाळा पूर्व कौशल्य विकासासाठी शिक्षणाची व शिघ्र हस्तक्षेपाची गरज असलेल्या विद्यार्थ्याकरीता (३ ते ६ वयोगटाकरीता)-
१. मदतनीस भत्ता - जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तज्ञ वैदयकिय अधिका-यांनी व विशेष शिक्षक, थेरपीस्ट यांनी शिफारस केलेले. शस्त्रक्रिया झालेल्या व थेरपीची गरज असलेल्या शरिराच्या खालचे दोन्ही अंग नसलेले व सवंगडी नसलेल्या दृष्टिदोष असलेल्या बालकांनाही हलनचलनास समस्या निर्माण होत असते. अशा बालकांना नियमित अंगणवाडीत ये-जा करणेसाठी दरमहा १५०/- प्रमाण एकूणे १० महिने करिता एकूण रु. १५००/-मदतनीस भत्ता अदा करणेत येईल त्या विद्याथ्र्यांची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील त्या मुलांना अंगणवाडीत आणण्यासाठी शालेय व्यवस्थापन / ग्राम/वार्ड शिक्षण समितीच्या शिफारशीने स्वयंसेवक नेमुन प्रतिमहा मानधन देण्यात येईल.
२. प्रवासभत्ता / परिवहन भत्ता:- ज्या गावांमध्ये विदयार्थ्यांच्या इयत्ता प्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास किंवा निमशहरी व शहरी भागात शाळेचे अंतर ३ किमी पेक्षा अधिक असल्यास अशा वेळी त्यांना सुरक्षितपणे नियमित शाळेत ये-जा करणेसाठी प्रवास भत्ता अदा करणेत यावा असे नमूद आहे. तसेच थेरपीची आवश्यकता असणा-या विदयार्थ्यांना थेरपी सेंटर मध्ये ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता दरमहा रु. १५०/ प्रमाणे १० महिने करिता रु.१५००/-अदा करणेत येईल. त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील.
३. वाचक भत्ता:- वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणा-या दुक अध्ययन शैलीच्या विदयार्थ्यांना अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने गोष्टी ये करपल्लवी किंवा गेस्टचर्सचा वापर करुन सहाय्य करणा-या वाचकास अनुवादकास प्रतो महा रु. ५००/- प्रमाणे १० महिने करीता ५०००/- मंजूर करण्यात आले आहेत. सदर लाभ २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता देण्यात येईल.
४. दिव्यांग मुलींना प्रोत्साहन भत्ता-वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणा-या विशेष गरजा असणा-या मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे, यासाठी नियमित अंगणवाडीत येण्यासाठी मुलींना प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येत आहे. करीता प्रती महा रु.२००/-प्रमाणे १० महिने करीता एकूण रु.२०००/- निधी मंजूर करण्यात येते. ( दिव्यांग प्रमाण ४०% आवश्यक)
विकासात्मक विलंबता असलेले इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या दिव्यांग विदयाथ्र्यांकरीता-
१. मदतनीस भत्ता:- जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तज्ज्ञ वैदयकिय अधिका-यांनी व विशेष शिक्षक, थेरपीस्ट यांनी शिफारस केलेले. शस्त्रक्रिया झालेल्या व थेरपीची गरज असलेल्या शरिराच्या खालचे दोन्ही अंग नसलेले द सवंगडी नसलेल्या, दृष्टिदोष असलेल्या बालकांनाही हलनचलनास समस्या निर्माण होत असते. अशा बालकांना नियमित शाळेत ये-जा करणेसाठी दरमहा १५०/-प्रमाण एकूणे १० महिने करिता एकूण रु. १५००/- मदतनीस भत्ता अदा करणेत येईल. त्या विद्याथ्र्यांची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी शालेय व्यवस्थापन / ग्राम/वार्ड शिक्षण समितीच्या शिफारशीने स्वयंसेवक नेमुन प्रतिमहा मानधन देण्यात
२. प्रवासभत्ता / परिवहन भत्ता:- ज्या गावांमध्ये विदयार्थ्याच्या इयत्ता प्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास किंवा निमशहरी व शहरी भागात शाळेचे अंतर ३ किमी पेक्षा अधिक असल्यास अशा वेळी त्यांना सुरक्षितपणे नियमित शाळेत ये-जा करणेसाठी प्रवास भत्ता अदा करणेत यावा असे नमूद आहे. तसेच थेरपीची आवश्यकता असणा-या विदयार्थ्याना थेरपी सेंटर मध्ये ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता दरमहा रु.१५०/ प्रमाणे १० महिने करिता रु.१५००/-अदा करणेत येईल. त्या विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील.
३. वाचक भत्ता:- इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विशेष गरजा असणा-या श्रवण अध्ययन शैलीच्या विदयाथ्र्यांना (अंध) अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने पाठ, प्रश्नावल्या वाचन करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते यासाठी त्यांच्या वाचकास व कर्णबधिर विद्यार्थ्यांना सुलभ होण्यासाठी पाठ, संकल्पना समजून घ्यावयाची असल्यास अनुवादकाची मदत घ्यावी यासाठी वाचकास प्रती महा रु. १००/-एकूण १० महिने करिता एकूण रु. १०००/- वाचक भत्ता अदा करणेत येईल. अशा दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना सदर लाभ या शैक्षणिक वर्षाकरीता देण्यात येईल.
५. दिव्यांग मुलींना प्रोत्साहन भत्ता:- विशेष गरजा असणा-या मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे, यासाठी नियमित शाळेत येण्यासाठी मुलींना प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येत आहे. करीता प्रती महा रु. २००/- प्रमाणे १० महिने करीता एकूण रु.२०००/- निधी मंजूर करण्यात येते. ( दिव्यांग प्रमाण ४०% आवश्यक)
विकासात्मक विलंबता असलेले इ.१ ली ते इ.१२ वी पर्यंतच्या दिव्यांग विदयार्थ्याकरीता -
१. मदतनीस भत्ता:- जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तज्ज्ञ वैदयकिय अधिका-यांनी व विशेष शिक्षक, थेरपीस्ट यांनी शिफारस केलेले. शस्त्रक्रिया झालेल्या व थेरपीची गरज असलेल्या शरिराच्या खालचे दोन्ही अंग
नसलेले व सवंगडी नसलेल्या दृष्टिदोष असलेल्या बालकांनाही हलनचलनास समस्या निर्माण होत असते. अशा बालकांना नियमित हायस्कूल/महाविद्यालयात ये-जा करणेसाठी दरमहा १५०/- प्रमाण एकूणे १० महिने करिता एकूण रु. १५००/- मदतनीस भत्ता अदा करणेत येईल. त्या विद्याथ्यांची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील त्या मुलांना हायस्कूल/ महाविद्यालयात आणण्यासाठी शालेय व्यवस्थापन / ग्राम/वार्ड ● शिक्षण समितीच्या शिफारशीने स्वयंसेवक नेमुन प्रतिमहा मानधन देण्यात
२. प्रवासभत्ता /परिवहन भत्ता:- ज्या गावांमध्ये विदयार्थ्यांच्या इयत्ता प्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास किंवा निमशहरी व शहरी भागात शाळेचे अंतर ३ किमी पेक्षा अधिक असल्यास अशा वेळी त्यांना सुरक्षितपणे नियमित शाळेत ये-जा करणेसाठी प्रवास भत्ता अदा करणेत यावा असे नमूद आहे. तसेच थेरपीची आवश्यकता असणा-या विदयार्थ्याना थेरपी सेंटर मध्ये ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता दरमहा रु.१५०/ प्रमाणे १० महिने करिता रु.१५००/-अदा करणेत येईल. त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५% असणे आवश्यक राहील
३. वाचक भत्ता:- इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विशेष गरजा असणा-या श्रवण अध्ययन शैलीच्या विदयार्थ्याना (अंध) अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने पाठ, प्रश्नावल्या वाचन करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते यासाठी त्यांच्या वाचकास व कर्णबधिर विद्याथ्र्यांना सुलभ होण्यासाठी पाठ, संकल्पना समजून घ्यावयाची असल्यास अनुवादकाची मदत घ्यावी यासाठी वाचकास प्रती महा रु. १००/- एकूणे १० महिने करिता एकूण रु. १०००/-वाचक भत्ता अदा करणेत येईल. अशा दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना सदर लाभ या शैक्षणिक वर्षाकरीता देण्यात येईल.
४. दिव्यांग मुलींना प्रोत्साहन भत्ता:- विशेष गरजा असणा-या मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे, यासाठी नियमित शाळेत येण्यासाठी मुलींना प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येत आहे. करीता प्रती महा रु. २००/- प्रमाणे १० महिने करीता एकूण रु.२०००/- निधी मंजूर करण्यात येते. ( दिव्यांग प्रमाण ४०% आवश्यक) सदरच्या विविध शैक्षणिक सहाय्यभूत सेवा देणेबाबत खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून लाभाथ्यांची यादी सादर करण्यात यावी.
अटी व शर्ती-
- सदरचा मदतनीस व प्रवासभत्ता वाचक व प्रोत्साहन भत्ता यांचा लाभ पुर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक इ पर्यंत देण्याचे प्रस्तावित आहे. सदर यादया अशा तीन प्रकारात देण्यात याव्यात.
२. सदर लाभ मिळणा-या लाभार्थ्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र कमीतकमी ४०% पर्यंत अथवा च्यापुढे असावे. सदर लाभ अशाच मुलांना देण्याचे प्रस्तावित आहे. सदर लाभार्थ्यांच्या दिव्यांगत्वाविषयीचे प्रमाणपत्र यादीसोबत आपल्या दप्तरी ठेवण्यात यावे. सदर लाभार्थ्यांची संगणीकृत यादी सही शिक्क्यासह प्रत जिल्हास्तरावर सादर करण्यात यावी.
३. उपरोक्त संबंधित सर्व विद्यार्थ्यांची माहिती विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांनी स्वतंत्र स्वरुपात रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे आवश्यक आहे. कारण सदरची माहिती वेळोवेळी उपलब्ध करुन दयावी लागेल. ४. उपरोक्त ४ ते ९ लाभाबाबत विदयार्थ्यांचे मागणी अर्ज मुख्याध्यापकांच्या/मुख्य शिक्षकाच्या सही शिक्क्यासह हस्तगत करावेत.
५. सदर सर्व प्रकारचे लाभ हे शासकीय नियमान्वये देण्यात येणार आहेत. तसेच सदर लाभ पुरविण्याकरीता सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या दप्तरी व तदनंतर जिल्हास्तरावर जमा करावीत. (बँक बचत खातेच्या पास बुकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत खाते क्र. स्पष्ट दिसेल असे) तदनंतरच सदर लाभ देण्यात येईल. सदर लाभ देण्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेल्या अधिसुचना क्र.पीआरई-२०१०/प्र.क्र.२१२ (बी)/पीई १ दि. ११ ऑक्टोबर २०११ मधील भाग तीन मधील ५ व ६ नुसार RTE act २००९ च्या कलम ६ च्या प्रयोजनार्थ क्षेत्रे व हददी अनुसार राज्य शासन व स्थानिक प्राधिकरणाच्या शाळांना व त्यातील विदयार्थ्यांनाच सर्व अनुदान ग्राहय राहतील.
मदतनीस / प्रवासभत्ता / प्रोत्साहन भत्ता मागणी अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक राहतील-
1) आधार कार्ड
2) मागणी अर्ज
3) मुख्याध्यापक प्रमाणपत्र
4) बँक पासबुक
5) अपंग प्रमाणपत्र
6) मुख्याध्यापक उपस्थिती प्रमाणपत्र
7) इतर आवश्यक कागतपत्रे
विनंती अर्ज
विषय:- विशेष गरजा असणा-या माझ्या पाल्यास शैक्षणिक सहाय्यभूत सेवा मिळाणेबाबत..
मी पालक श्री श्रीमती ------------------------------------------------------------- -राहणार...... ता.--------- पालकांचा मो.नं.---------------------जिल्हा -------------, विनंती अर्ज करीतो/ करिते की, माझा/माझी पाल्या कुमार/कुमारी--------------------------------------------------------हा/ही दिव्यांग प्रकार.------------------------------------- -असून प्रमाण ------------------ आहे. लिंग------------- आहे. त्याची/तीची जात-------------- आधार क्र.-------------- त्याचा/तीचा शाळेचे/ अंगणवाडीचे नाव......----------------जन्म तारीख---------------------आहे तो/ती अंगणवाडीत /इयत्ता मध्ये शिकत आहे.
शाळेचा व्यवस्थापन प्रकार.-----------------------हा असून केंद्र शाळा विद्यार्थ्याचे बैंक खाते असलेल्या बँकेचे नाव.-------------------------- A/C No--------------------- IFSC Code-------------------आहे.
त्याचे प्राथमिक / माध्यमिक शिक्षण पूर्ण करणेकामी यास/हिस माहे जून/जुलै/ऑगस्ट २० पासून नियमित शाळेत पाठविणार आहे. शाळेत सुरक्षितपणे ये-जा करता यावे यासाठी मदतनीस भत्ता/ प्रवास भत्ता / तसेच अध्ययन करणेसाठी वाचक (Reader) भत्ता / मुलींना प्रोत्साहन पर मिळणारा भत्ता यापैकी १/२/३ सहाय्यभूत सेवेची गरज आहे. करीता सदर सहाय्यभूत सेवा मिळणेसाठी अर्ज करीत आहे. तो / ती रोज शाळेत जात असून त्याची तीची अंगणवाडीतील /शाळेतील उपस्थिती दरवर्षी ७५% चे घर असते. यावर्षी ही राहील याची ग्वाही देतो. सदर सेवा मिळणेच्या निकषानुसार माझे पाल्य पात्र असल्यास या शैक्षणिक वर्षासाठी सदरची शैक्षणीक सहाय्यभूत सेवा मिळावी ही विनंती.
घरचा पत्ता मोबाईल नं.
पालकाची स्वाक्षरी व नाव




- Reviews (0)
Nothing Found...Leave a review