- घर
- Show Content
यशस्वी कथा
यशस्वी कथा
यशाचे गमक
अकस्मात बहिरेपणा आल्यानंतर मोठाच मानसिक धक्का बसला होता..आता आयुष्यात पुढे काय हा प्रश्न समोर आलाच..पण त्याने हिंमत हरली नाही. शारीरिक व्याधीवर मात करायची आणि पुढे जायचे असा निर्धार केला..झटून अभ्यास केला, दहावीत आणि आता बारावीतही ६५० पैकी ६२१ गुणांची कमाई केली. ही यशस्वी कथा आहे दादरमधील अभिषेक कोनळे या विद्यार्थ्यांच्या जिद्दीची.
अकस्मात बहिरेपणा आल्यानंतर मोठाच मानसिक धक्का बसला होता..आता आयुष्यात पुढे काय हा प्रश्न समोर आलाच..पण त्याने हिंमत हरली नाही. शारीरिक व्याधीवर मात करायची आणि पुढे जायचे असा निर्धार केला..झटून अभ्यास केला, दहावीत आणि आता बारावीतही ६५० पैकी ६२१ गुणांची कमाई केली. ही यशस्वी कथा आहे दादरमधील अभिषेक कोनळे या विद्यार्थ्यांच्या जिद्दीची.
दादरच्या व्ही.एन. सुळे शाळेचा विद्यार्थी असलेल्या अभिषेकला दहावीची परीक्षा अवघी दहा दिवसांवर असताना अचानकपणे दोन्ही कानांनी ऐकू येईनासे झाले. त्याही परिस्थितीत त्याने दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत अभिषेकने तब्बल ९६.५ टक्के इतक्या गुणांची कमाई करून शारीरिक कुवतीचा आपल्या बुद्धीशी काहीही संबंध नसल्याचे पहिल्यांदा सिद्ध केले.
आयआयटीत प्रवेश मिळविण्याच्या उद्देशाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्याने दादरच्या पेस अॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळविला. संस्थेच्या प्रवेश परीक्षेत अव्वल कामगिरी करून शिष्यवृत्ती मिळवत शुल्कामध्ये सवलतही मिळविली. दोन्ही कानांनी काहीच ऐकू येत नसल्याने एप्रिल, २०१२पासून सुरू होणाऱ्या लेक्चर्सना मात्र त्याला हजेरी लावता आली नाही. दरम्यानच्या काळात म्हणजे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात अभिषेकच्या एका कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉकलर इम्प्लॉट करून त्याला एका कानाने ऐकू येऊ लागले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याच्या दुसऱ्या कानावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर कुठे अभिषेकला ऑक्टोबर, २०१३पासून नियमित महाविद्यालयात जाता येणे शक्य झाले.
जेईईमध्येही गुणकमाई
आयआयटी प्रवेशासाठी जेईई-मेन्स आणि अॅडव्हान्स या दोन प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या दोन्ही परीक्षांकरिता विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच अभ्यासाला सुरूवात करतात. दोन-अडीच वर्षे झटून अभ्यास केल्याशिवाय या परीक्षांमध्ये यश मिळविणे शक्य नाही. पण, बहिरेपणामुळे अभ्यासाचे सात-आठ महिने बुडूनही अभिषेकने जेईई-मेन्सचेही आव्हान लीलया पेलले. या परीक्षेत २५० गुणांची कमाई करत त्याने इथेही ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या गुणांच्या जोरावर तो जेईई-अॅडव्हान्स या आयआयटी प्रवेशासाठीच्या दुसऱ्या टप्प्यावरील आणखी कठीण परीक्षेसाठी पात्र ठरला. देशभरातून केवळ दीड लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, हे विशेष.
अजुनही अभिषेकला यंत्राशिवाय ऐकू येत नाही. पण, अकस्मातपणे आलेल्या या बहिरेपणाने तो खचून गेला नाही. आपला अभ्यासातला जोम कायम ठेवत त्याने त्यावरही मात केली. यात त्याला आपली आई सीमा यांची खूपच मदत झाली. अभिषेक ओठांच्या हालचालींवरून समोरच्याचे ‘ऐकायला’ शिकला होता. बीएस्सी असलेल्या सीमा यांनीही त्याच्यासोबत हे तंत्र जाणून घेतले. त्याला अभ्यासात मदत करताना या तंत्राचा त्यांना फारच उपयोग झाला.




- Reviews (0)
Nothing Found...Leave a review